Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर टेम्पो पलटी

तेरा जण जखमी

खोपोली : प्रतिनिधी

भरधाव वेगाने जाणारा टेम्पो वळणावर नियंत्रित न झाल्याने पलटी होवून, तेरा जण जखमी झाल्याची घटना खालापूर तालुक्यातील लोधिवली गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. 29) सकाळी घडली.

टेम्पो (एमएच-04,एफडी-9977) गुरुवारी सकाळी पनवेलहून खोपोलीच्या दिशेने मजूरांना घेऊन निघाला होता. खालापूर हद्दीत लोधिवली येथील अंबानी रुग्णालयासमोर एका वळणावर टेम्पो चालक मालाप्पा शिवचलाप्पा नारायणकर (वय 30, सध्या रा. भिंगारी, पनवेल) याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो दुभाजकाला धडकून पलटी झाला. टेम्पोत बसलेले मजूर आकाश दयाराम मरावी (वय 21), अर्जुन कन्हैया कुमराम (वय 19), पवन रुपलाल हिके (वय 25), सुखदास हरिश्चंद्र पंद्रे (वय 24), जालिंदर  भोई (वय 24), कमलेश गणेश पंद्रे ( वय 24), राकेश तेजालाल हिके (वय20), दिनेश मनसारा हिके (वय 25), विकास रुपलाल करवते (वय 18), रोहित ईश्वर करवते (वय 22), प्रीतम शहा लाल मरावी (वय 20, सर्व मूळ रा. मध्यप्रदेश), गणेश माणिकराव पवार (वय 45, बुटीबोरी नागपूर) यांच्यासह चालक माल्लापा नारायणकर जखमी झाले आहेत. त्यांना चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांना अधिक उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात   हलविण्यात आले आहे.

या अपघाताचे वृत्त समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास सुरू आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply