मोहोपाडा : प्रतिनिधी
32व्या रस्ते सुरक्षा अभियान 2021 अंतर्गत सडक सुरक्षा जीवन रक्षा बद्दल रसायनी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदीप पाटील, नाईक राकेश म्हात्रे, रायसिंग वसावे यांनी रसायनी परिसरातील काही वाहनांना रिफ्लेक्टर लावून वाहनचालकांना रस्ता सुरक्षासंबंधी मार्गदर्शन करण्याचे अभियान राबविले. या उपक्रमाबाबत नागरिकांनी रसायनी वाहतूक पोलिसांचे कौतुक केले.
वाहतुकीचे रस्त्यावरील विविध चिन्हे, सर्व वाहन चालकांच्या प्रबोधनार्थ माहिती पत्रके, डिजीटल लॉकरची प्रणाली व त्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले जात आहे. गाडी चालवताना घ्यावयाची काळजी, गाडीबद्दल दक्षता, अनुज्ञप्ती संबंधीचे सर्वसाधारण ज्ञान, अनुज्ञप्ती रद्द होण्याची कारणे आणि त्यांचे नूतनीकरण याबद्दलचे उत्तम मार्गदर्शन रसायनी वाहतूक पोलीस संदिप पाटील, राकेश म्हात्रे व रायसिंग वसावे करीत आहेत.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, रसायनी पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी परीसरात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रसायनी वाहतूक पोलीस वाहनचालकांत जनजागृती करीत आहेत.