मुंबई ः प्रतिनिधी
इंग्लंडविरोधातील दुसर्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याला गोलंदाजी न देण्याचे कर्णधार विराट कोहलीने दिलेले कारण ऐकून माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने संताप व्यक्त केला. 337 इतकी आव्हानात्मक धावसंख्या असतानाही इंग्लंडने भारतीय संघाचा सहज पराभव केला. सहा गडी व 39 चेंडू राखत इंग्लंडने भारताचा पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली. इंग्लडंचे फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करीत असताना विराटने हार्दिकला गोलंदाजी का दिली नाही यावरून क्रिकेटप्रेमी संताप व्यक्त करीत आहेत. त्यातच आता सेहवागनेही हार्दिक पांड्यावर जास्त वर्कलोड नसल्याचे म्हटले आहे.
बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी भारतीय गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. कृणाल पांड्या व कुलदीप यादव यांनी 16 ओव्हरमध्ये 156 धावा दिल्या. त्यांना एकही विकेट घेता आली नाही, तर दुसरीकडे भुवनेश्वर कुमार व प्रसिध कृष्णा यांना मात्र यश मिळाले, पण इंग्लंडने जबरदस्त फलंदाजी केल्यामुळे त्यांनी विजयाला गवसणी घातली. विराट कोहलीला जेव्हा हार्दिक पांड्याला गोलंदाजी का देण्यात आली नाही, असे विचारण्यात आले तेव्हा त्याने त्याची बॉडी आणि वर्कलोड यांचे संतुलन राखणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सेहवागने म्हटले की, भारत पुढील काही महिने कोणतेही सामने खेळणार नसताना फक्त हार्दिक पांड्याचा वर्कलोड सांभाळण्यासाठी एकदिवसीय मालिक गमावणे योग्य नाही. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याने चार ते पाच ओव्हर टाकणे अपेक्षित आहे. सेहवागने या वेळी 50 ओव्हर्समुळे थकवा येतो हे मान्य केले आहे, पण पाच-सहा ओव्हर टाकल्याने काही फरक पडत नाही, असेही सांगितले.
Check Also
पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी
सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …