Breaking News

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यातर्फे टेनिसपटू आकांशा नितुरेचा सन्मान

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील रहिवासी आकांशा नितुरे हिने चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धेतील एकेरी आणि दुहेरी गटातील विजेतेपद पटकवल्याबद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तिच्या घरी जाऊन सन्मान केला. आपली जिद्द आणि मेहनतीनेच्या जोरावर विजेतेपद पटकवल्याबद्दल आकांशाचे त्यांनी कौतुक केले. कोरोना काळात सराव करायला खूप कमी वेळ आणि स्वतः व तिचे कुटुंब संक्रमित होऊन सुद्धा तिने जिद्द सोडली नाही. याबाबद्दल विक्रांत पाटील यांनी तिचे विशेष कौतूक केले. या वेळी विक्रांत पाटील यांनी आकांशाबरोबर संवाद साधताना तिच्या दिनचर्या, सराव आणि मिळालेल्या विजेतेपदांची माहिती घेतली. आकांशा येणार्‍या काळात देशाचे नाव टेनिसमध्ये नक्कीच उजवल करेन, असे मत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केले आणि आकांशाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply