Breaking News

श्रीवर्धनच्या समुद्रात नौकेला जलसमाधी; चार जण बचावले; लाखोंचे नुकसान

श्रीवर्धन : प्रतिनिधी

जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी मत्स्य व्यावसायिक संस्थेच्या लक्ष्मी विजय नौका (आयएनडी एमएच 3 एमएम 4193) रविवारी (दि. 23) समुद्रात बुडाली. नौकेतील चार खलाशी बचावले, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. समद्रामध्ये होत असलेल्या छोट्या-मोठ्या वादळामुळे मच्छीमारी धोक्यात आली आहे. रविवारी दुपारनंतर येथील समुद्रात सोसाट्याचे वारे वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे मच्छीमार आपल्या नौका मूळगाव येथील खांडीमध्ये सुरक्षित ठिकाणी नेत असताना अनिकेत लक्ष्मण रघुवीर यांच्या लक्ष्मी विजय नौकेचे सुकाणू तुटले व नौका भरकटली. ती दगडावर आदळल्याने नौकेला जलसमाधी मिळाली. या नौकेमधील अनिकेत रघुवीर यांच्यासह बाळकृष्ण रघुवीर, जयेश रघुवीर, गणेश कुलाबकर हे खलाशी समुद्राच्या पाण्याशी झुंज देत बालंबाल बचावले, मात्र लक्ष्मी विजय नौका व जाळी मिळून सुमारे 12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply