Breaking News

अंगणवाडीच्या इमारतीचे न्हावाखाडीत उद्घाटन; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

न्हावाखाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा उद्घाटन सोहळा तसेच विविध साहित्यांचे वाटप सोहळ्याचे शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या निधीमधून या अंगणवाडीचे काम करण्यात आले असून पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांनी केलेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाले आहे. न्हावाखाडी येथे जिल्हा परिषदेचा आठ लाख निधी वापरून अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या कामासाठी पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. याचे उद्घाटन जि. प. सदस्य रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच न्हावा ग्रामपंचायतीच्या माध्यामातून शैक्षणिक टॅब, कृत्रिम अवयव, घरघंटी आणि मंडप वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. या वेळी न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र घरत यांना उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उद्योजक जे. एम. म्हात्रे, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, काशिनाथ पाटील, न्हावा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंजुषा ठाकूर, माजी उपसरपंच किसन पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, साधना तांडेल, सदस्य प्रल्हाद पाटील, देवेंद्र भोईर, सदस्य निर्मला ठाकूर, अमृता पाटील, कल्पना घरत, विजया ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य योगिता भगत, माजी सरपंच हनुमान भोईर, माजी अध्यक्ष आशिष पाटील, तंटामुक्त अध्यक्ष प्रदीप ठाकूर, मीनाक्षी पाटील, महिला मंडळ अध्यक्ष शांता म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply