Breaking News

उरणमध्ये आरोग्य शिबिराला प्रतिसाद

उरण : प्रतिनिधी

नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येकाला निरोगी, सुंदर आयुष्य जगता यावे या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ उरण, उरण डॉक्टर असोसिएशन, राजे शिवाजी मित्र मंडळ यांच्या वतीने उरण शहरातील बुरुड आळी येथे मेगा मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या मेडिकल कॅम्पला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मेगा मेडिकल चेकअप कॅम्पचे उद्घाटन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत, लायन्स क्लब डिस्ट्रिक गव्हर्नर लायन लूनकरण तावरी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध रोगाशी संबंधित तपासणी करण्यात आली. या वेळी डॉ. संतोष गाडे, डॉ. संतोष वर्मा, डॉ. प्रीती गाडे, डॉ. आकाश भारती, डॉ. प्रशांत पवार, डॉ. राहुल वर्मा, डॉ. शिवानी गाडे, डॉ. चेतन पाटील, डॉ. अमोल गिरी, डॉ. सविता गिरी, डॉ. अमोल गिरी, डॉ. अनिता कोळी, डॉ. क्लिटा परेरा आदी डॉक्टरांनी शिबिरात येणार्‍या नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केले, तसेच या वेळी रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. आमदार महेश बालदी, भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक कौशिक शहा, लायन्स क्लब ऑफ उरणचे प्रेसिडेंट नरेंद्र ठाकूर, सेक्रेटरी निलिमा नारखेडे, खजिनदार मनीष घरत, उपाध्यक्ष सदानंद गायकवाड, डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन डॉ. प्रीती गाडे, संजीव अग्रवाल, दत्तात्रेय नवाले, साहेबराव ओहोळ, चंद्रकांत ठक्कर, शंकर कोळी, स्वप्ना गायकवाड, तसेच उरण डॉक्टर असोसिएशनच्या सेक्रेटरी डॉ. पल्लवी पाटील, खजिनदार डॉ. भक्ती कुंडेलवाल आणि राजे शिवाजी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विलास खैरे, प्रथमेश गायकवाड, सेक्रेटरी कल्पेश खैरे, उपाध्यक्ष सुरज पडवळ, खजिनदार संकेत गायकवाड, संस्थापक कार्यकारिणी समीर गाडे, कुणाल गायकवाड, रितेश गायकवाड, दीपक खैरे, सचिन सोनकर आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply