Breaking News

कोरोनाचे वेगाने संक्रमण

इतर देशांच्या तुलनेत मात्र भारत सुस्थितीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढला आहे तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे, परंतु कोरोनविरोधातील लढाईत इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत आहे. अमेरिका, इटली, जर्मनी, स्पेन यांसारख्या विकसित देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. दरम्यान, देशात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्या ठिकाणी काय उपाययोजना करायच्या याबाबत जागतिक आरोग्य संघटनेशी चर्चा केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
देशात गुरुवार (दि. 16) संपलेल्या 24 तासांत 826 कोरोना पॉझिटिव्ह देशात आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 759 एवढी झाली आहे, तर आतापर्यंत 420 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 28 मृत्यूंची नोंद झाली असून हे प्रमाण कमी झाले आहे. देशातील 325 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेसोबतही चर्चा झाली आहे. देशात लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाययोजना करण्यासाठी अवधी मिळेल, असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, जगभरात दर दहा लाख लोकांमागे कोरोनाबाधितांचा आकडा 267 एवढा आहे. अमेरिकेमध्ये दर 10 लाख लोकांमागे कोरोनाबा धितांचे प्रमाण 1496 एवढे आहे. स्पेनमध्ये 3 हजार 864, इटलीत हजार 732 आणि फ्रान्समध्ये 2 हजार 265 एवढे आहे, तर भारतात मात्र दर 10 लाख लोकांमागे केवळ 7 कोरोनाबाधित आहेत.
धारावीतील वाढती रूग्णसंख्या चिंताजनक
मुंबई : धारावीत गेल्या 12 तासांत कोरोनाचे 26 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकट्या धारावीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 86वर गेली आहे. शिवाय गुरुवारी (दि. 16) एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूही झाल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला आहे.
राज्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग मुंबईत दिसून येतो, तर मुंबईमध्ये धारावीत कोरोना झपाट्याने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसभरात मुंबईत तीन जणांच्या मृत्यूसह 107 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा आता दोन हजार 43वर पोहचला आहे. यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या 116 जणांचा समावेश आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply