Breaking News

रोह्यातील शाळांना ‘आपुलकी’ची मदत

शैक्षणिक, क्रीडा साहित्य व पुस्तकांची भेट

रोहे : प्रतिनिधी

तालुक्यातील पन्नासपेक्षा अधिक शाळांना आपुलकी संस्थे तर्फे नुकताच शैक्षणिक व क्रीडा साहित्य तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक संच यांचे वाटप करण्यात आले.

कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर वाढला आहे. अवांतर वाचन आणि मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत यासाठी आपुलकी संस्थेने रोहा तालुक्यातील पन्नासपेक्षा अधिक शाळांमध्ये बॅट, बॉल, हँडबॉल, सापशिडी, लगोरी, स्किपिंग रोप्स, हँडरिंग, लेझीम आदी साहित्य तसेच पुस्तक संच यांचे वाटप केले.

यावेळी स्पंदन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा आंबरे व उपस्थित शिक्षकांनी आपुलकी संस्थेच्या कोषाध्यक्ष माधुरी बेंद्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आपुलकी संस्थेचे अध्यक्ष किशोर सोमण, विश्वस्त शेखर सप्रे, भरतशेठ जैन तसेच स्वाती ताम्हाणे, शुभम ताम्हाणे, कार्यवाह नंदकुमार नलावडे, जितेंद्र जोशी यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply