कर्जत : बातमीदार
तालुक्यातील दामत गावातील वीटभट्टीवरील आदिवासी विद्यार्थ्यांना माथेरान येथील नितीन शहा यांनी नुकताच कपडे, खेळणी आणि खाऊचे वाटप केले.
नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्या भाविका भगवान जामघरे या बिरदोले (ता. कर्जत) येथील विद्यार्थिनीने वीटभट्टीवर काम करणार्या स्थलांतरित आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांसाठी दामत येथे शाळा सुरु केली आहे. त्या शाळेत शिकणार्या मुलांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारीत झाल्यानंतर माथेरान येथील नितीन शहा या व्यवसायिकाने संपर्क साधून विद्यार्थ्यांना भेटवस्तू, कपडे आणि खेळणी देण्याची इच्छा व्यक्त केली व दामत येथे जाऊन सर्व 33 विद्यार्थ्यांना नवीन कपडे भेट दिले. यावेळी त्यांनी खेळणी आणि खाऊचे वाटप केले. त्यावेळी किशोर गायकवाड आणि भगवान जामघरे हे उपस्थित होते.
दरम्यान, नेरळ रेल्वे पॅसेंजर संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी बिरदोले येथे भाविका जामघरे हिच्या घरी जाऊन तिच्या कार्याचे कौतुक केले. व संघटनेच्या वतीने भाविकाला कॉलेज बॅग भेट दिली.