Breaking News

खालापूरच्या गुरुकुल विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन

खोपोली : प्रतिनिधी

देशाची सेवा करण्यासाठी सैन्यदल, पोलीस दल किंवा प्रशासकीय यंत्रणा हेच माध्यम आहे, हा गैरसमज सर्वांनी मनातून काढून टाकावा. प्रत्येकजण आपल्या हाती असलेल्या संसाधनातून आणि दैनंदिन जीवन जगत असताना देशाची सेवा सहजपणे करू शकतो, असे मत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी केले.

खालापुर तालुक्यातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सामाजिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात एक पुष्प अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्पण केले गेले. त्यावेळी गुरुनाथ साठेलकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.

विद्यार्थीदशेपासूनच आपण सामाजिक कार्याला प्राधान्य देण्यास शिकले पाहिजे, हीच संस्कृती आणि हेच खरे संस्कार असल्याचे जगदिश मरागजे यांनी सांगितले.

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वमंगल दास स्वामी आणि ब्रह्मस्वरूप दास स्वामी यांनी स्वागत करून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश पवार यांनी केले. या वेळी अपघातग्रस्तांना मदत करतानाच्या छायाचित्रांचा स्लाईड शो पाहून संस्थेचे विद्यार्थी आणि कर्मचारी प्रभावित झाले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply