पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर बुधवारी (दि. 30) उत्साहात पार पडले. तक्का येथील मराठी शाळेत झालेल्या या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे आणि ज्येष्ठ नेते तुकाराम बहिरा यांच्या हस्ते झाले.
या शिबिरामध्ये गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांची जनरल तपासणी करण्यात आली, तसेच कोविड लसीकरण, बीएमडी कॅम्प आणि रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिराचे आयोजन नगरसेवक अजय बहिरा आणि युवानेते प्रतिक बहिरा यांच्या पुढाकराने करण्यात आले. या वेळी पनवेल महापलिकेचे नगरसेवक अजय बहीरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेवक प्रभाकर बहीरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहीरा, युवानेते प्रतिक बहिरा, भाजपनेते मनोहर मुंबईकर, संदीप बहिरा, बबन कांबळे, तासकर साहेब, विजय राऊत, हारुन शेख, तुशार बहिरा, प्रमोद बहिरा, किरण बहीरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.