नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि. 17) राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली, पण नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याविषयी निश्चित माहिती मिळू शकली नाही.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे. सत्ताधारी पक्षांमधील धुसफूस सातत्याने समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …