खारघर : रामप्रहर वृत्त
जर्नादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 2) वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमावेळी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ.एस.टी. गडदे, संचालक अमोघ ठाकूर, शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, भाजप जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, गुरूनाथ गायकर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, आरती नवघरे, संघटक प्रभाकर जोशी, सरचिटणीस दीपक शिंदे, विनोद ठाकूर, दीपक ठाकूर, युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभ पाटील, खारघर अध्यक्ष नितेश पाटील, अक्षय लोखंडे, महिला मोर्चाच्या खारघर शहर अध्यक्ष साधना पवार, सोशल मीडिया सहसंयोजिका स्नेहल बुधाई यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सर्वप्रथम क्रीडा ध्वज फडकविण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली. निरनिराळ्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले क्रीडा कौशल्य पणास लावले. यात रेड हाऊस, ब्ल्यू हाऊस, यलो हाऊस, ग्रीन हाऊस यांनी सहभाग घेऊन ब्ल्यू हाऊसने प्रथम क्रमांक मिळवला. पालकवर्गानेसुद्धा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्साह दाखवला.
पाहुण्यांसमोर विद्यार्थ्यांनी कराटे, जिम्नॅस्टिक, प्री-प्रायमरी डान्स, मास पीटी, लेझीम, पिरॅमिड मार्च पास्ट यांच्या कवायती सादर केल्या. सर्व स्पर्धा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड ः रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलचे …