Breaking News

नमो चषक अंतर्गत खारघरमध्ये गुरुवारपासून क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत खारघरमध्ये 6 ते 9 फेब्रुवारीदरम्यान टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
खारघर सेक्टर 14 येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा दिवस-रात्र स्वरूपात होणार आहे. या स्पर्धेत 24 संघ खेळणार असून विजेत्या संघाला एक लाख 11 हजार 111 रुपये, उपविजेत्यास 55 हजार 555 रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघास 33 हजार 333 रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीजला मोटरसायकल आणि दररोज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉमध्ये एक सायकल अशी भरघोस पारितोषिके आहेत.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 6 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता होणार असून या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री व भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते व कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व नमो चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.
या क्रिकेट सामन्यांच्या यशस्वी आयोजनासाठी जय्यत तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्रिकेट स्पर्धेचे संयोजक भारतीय जनता पक्ष खारघर व प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्तजर्नादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …

Leave a Reply