कामोठे : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा मंगळवारी (दि. 4) मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे मुख्य शीर्षक सिद्धिरस्तु म्हणजेच जीवनात यशस्वी व्हा असा होतो. त्यालाच अनुसरून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात, जीवनात तुम्ही खूप मोठे व्हा, मात्र आपल्या आई-वडिलांचे संस्कार व शिक्षकांचे मार्गदर्शन विसरू नका, असा मोलाचा सल्ला देऊन स्वतःबरोबरच आपल्या शाळेचे नावही मोठे करा, अशा शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाळेतर्फे भेटवस्तू देण्यात आली.
कार्यक्रमास पीआरओ बाळासाहेब कारंडे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, शिक्षक पालक समितीचे सदस्य, शिक्षक आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत शाळेचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, पर्यवेक्षिका अर्चना माथूर व रुहल दुबे यांनी केले.
या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार तसेच नाटक सादरीकरणाद्वारे निरोप दिला, तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी भावूक होत शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्तजर्नादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी …