Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने होणार्‍या अंगणवाडीच्या कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे अंगणवाडीसाठी निधीमंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.5) झाले.
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्यामुळे भोकरपाडा येथे अंगणवाडी बांधण्यासाठी 11 लाख 25 हजार रुपयांचा निधीमंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते झाले.
या वेळी भाजपचे नेरे जिल्हा परिषद अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, बोनशेतचे माजी उपसरपंच मुकेश फडके, ग्रामविकास अधिकारी जनार्दन सरडे, भास्कर फुलोरे, कल्पेश फुलोरे, गोटीराम फुलोरे, हनुमान फुलोरे, रूपेश फुलोरे, किशोर फुलोरे, दीपक फुलोरे, हरिचंद्र फुलोरे, जोमा गोपाल फुलोरे, हिमालय गायकर, गजानन फुलोरे, विजय बळीराम फुलोरे, निकेतन फुलोरे, अभिजित फुलोरे, अनिकेत फुलोरे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply