Breaking News

आदिवासी महिलांसाठी ‘होपमिरर’चा प्रकल्प

महिलांना दिले जातेय विविध व्यवसायांचे प्रशिक्षण

 

खारघर : रामप्रहर वृत्त

होपमिरर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी होपमिररच्या टीमने खारघर शहराजवळ असलेल्या दोन आदिवासी वाडी घोलवाडी आणि आंबावाडी यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये येथील महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी होपमिररची टीम प्रयत्नशील आहे. होपमिरर फाउंडेशनतर्फे प्रथम खारघर शहराजवळील घोलवाडी आणि आंबावाडी विभागाचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये व्यवसाय पद्धती, मुलांची शैक्षणिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत आणि पायाभूत सुविधा अशा बाबी तपासण्यात आल्या. होपमिररची टीम या आदिवासी गावांची काळजी घेत असल्याने या आदिवासी गावाला आधुनिक गावात बदलण्यासाठी फाउंडेशननेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणमध्ये दिसून आले की, महिला वर्ग बेरोजगार आहे. यासाठी प्रोजेक्ट सखी-महिला व्यापार योजना हा प्रकल्प गेल्या दोन महिन्यांपासून फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आला. यामध्ये महिलांकरीता अगरबत्ती बनवायची मशीन विकत घेउन त्यांना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना कमावण्याची आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची संधी मिळेल. या आदिवासी महिलांनी बनविलेल्या अगरबत्ती बाजारपेठेमध्ये सखी अगरबत्ती या नावाने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या आम्ही दोन आदिवासी गरजू महिलांना रोजगार दिला आहे आणि पुढे जसा प्रतिसाद मिळेल त्यानुसार आम्ही अजून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करू, असे होपमिरर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष रमझान शेख यांनी बोलताना सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply