पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोना मोठ्या प्रमाणात हातपाय पसरू लागला असून, काही रुग्णांचा बळीही घेत आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 12) आणखी 45 रुग्णांची नोंद झाली असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 30, उरण तालुक्यातील सात, पनवेल ग्रामीणमधील चार, पेण तालुक्यातील दोन, तर कर्जत व रोहा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृत पावलेले रुग्ण पनवेल ग्रामीणमधील दोन आणि पनवेल मनपा व कर्जतमधील प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1652वर जाऊन पोहोचला असून, मृतांची संख्या 71 झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …