Breaking News

मोरा जेट्टीच्या शौचालयाची दुरवस्था

प्रवाशांची गैरसोय; लक्ष देण्याची मेरी टाईम बोर्डाकडे मागणी

उरण : प्रतिनिधी

उरण येथील मोरा जेट्टीच्या  शौचालयाची ही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, मात्र त्याकडे मेरी टाईम बोर्डचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशामध्ये वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.  मेरीटाइम बोर्डने या समस्यानकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी विशेष करून महिला वर्ग करीत आहे.

मुंबई व घारापुरी बेटावर जाण्यासाठी मोरा जेटीचा वापर सर्रास  प्रवाशी नागरीक करत आहेत. येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांसाठी मोरा जेटीवर मेरिटाइम बोर्ड मार्फत ज्या सुख सोयी असायला हव्या आहेत. त्या दिल्या जात नाहीत. विशेष म्हणजे मुख्य गोष्ट शौचालय चांगल्या प्रकारे असायला आहे, परंतु मोरा जेटीवर असे काहीच दिसत नाही. मोरा ते भाऊचा धक्का प्रवासात विशेष करून 50 टक्के महिला वर्ग प्रवास करीत आहेत, मात्र जेटीवर शौचालय ची दुरवस्था झाली असून दरवाजे ही मोडक्या अवस्थेत आहेत. यामुळे  विशेष म्हणजे महिला वर्गाला याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महिला वर्ग करीत आहेत.

मोरा जेटीच्या दुरुस्तीचे टेंडर मेरिटाईम बोर्डाने काढले आहे. लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करून प्रवाशांची गैरसोय दूर केली जाईल.

-पी. बी. पवार, बंदर निरीक्षक, मोरा, उरण

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply