Breaking News

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छता मोहीम; रेवदंड्यात 53 टन कचर्‍याचे संकलन

अलिबाग : प्रतिनिधी

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (दि. 1) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत रस्ते, परिसर व समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला. या वेळी तब्बल 53 टन कचर्‍याचे संकलन करण्यात आले. भारताचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रेवदंडा ग्रामपंचायत परिसर, रस्ते व समुद्र किनारे, स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळपासून श्री सदस्य हातामध्ये झाडू, पंजे, फावडे, कोयते तसेच टेम्पो, ट्रॅक्टर, जेसीबी अशा एकूण 41 वाहनांसह या मोहिमेत सहभागी झाले होते. सरपंच मनिषा चुणेकर, ग्रामपंचायत सदस्य शरद गोंधळी, राजन वाडकर, सुरेश खोत, संतोष मोरे यांनीही या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. या अभियानात  एकूण 3549 श्रीसदस्यांनी रेवदंडा गावामधील  जुनी पोस्ट गल्ली, वाडी मोहल्ला, मोठा कोळीवाडा, मधला कोळीवाडा, भणसाळी आळी, आगर आळी, पागार मोहल्ला, बहिरी गल्ली, नारायण आळी, सुतार आळी, कुंभार आळी, गणपती आळी, विठोबा आळी, वसईकर आळी, पारनाका, श्रीमारुती आळी, बापदेव मंदिर गल्ली, चुणेकर आळी, गोरेगांवकर गल्ली, सातखणी चर्च, शाळा, मैदान, मंदिर परिसर व दोन स्मशानभूमी असा एकूण 23164 चौमी. परिसर, व समुद्र किनारा स्वच्छ केला असून, त्यातून 53 टन कचरा गोळा करण्यात आला आहे. सदर कचरा रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सहमतीने श्री. वरसोलकर यांच्या खाजगी जागेत जमा करण्यात आला.

वावोशी परिसराची श्रीसदस्यांकडून स्वच्छता

खालापूर : तालुक्यातील वावोशी परिसरातील श्रीसदस्यांनी मंगळवारी सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये आणि परिसराची स्वच्छता केली. वावोशी परिसरातील श्रीसदस्यांची जांभिवली येथे बैठक होत असते. या श्रीसदस्यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी वावोशी परिसरातील जिल्हा परिषद शाळा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस दुरक्षेत्र तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात वावोशी, शिरवली, परखंदे, गोरठण, होराळे, जांभिवली, नंदनपाडा, वनवठे, आपटी, झाडाणी, डोणवत, नारंगी, तोंडली, स्वाली, गोठिवली, खरिवली, गोहे, करंबेळी, चिलठण येथील श्रीसदस्यांनी श्रमदान केले.

रोहा शहरात साफसफाई

रोहे : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी रोहा शहरातील सरकारी कार्यालये व रस्ते श्री सदस्यांनी स्वच्छ केले. पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रोहा शहरातील एकूण 12 सरकारी कार्यालये व प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात एकूण 510 श्री सदस्य सात सरकारी कर्मचारी तसेच 31 इतर मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी एकूण 35 टन कचरा गोळा करून डम्पिंग ग्राउंडमध्ये नेण्यात आला. न्या. समीर कमलाकर, नायब तहसीलदार राजेश थोरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद कोरे, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, बीएसएनएल अधिकारी सुवर्णा कदम, वनपाल एस. बी. चव्हाण एम. टी. वाघमारे यांनी अभियानास सहकार्य केले.

मुरूडमधील शासकीय कार्यालये आणि रुग्णालये झाली चकाचक

मुरूड : येथील 450 श्रीसदस्यांनी मुरूड शहरातील  शासकीय कार्यालये व रुग्णालयांत मंगळवारी    स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी 18 टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेची सुरवात सकाळी तहसीदार रोहन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. स्वतः शिंदे यांनी झाडू घेऊन स्वच्छता केली. नायब तहसीलदार रवींद्र सानप, भरती म्हात्रे, सचिन राजे, संजय तवर  आदी अधिकारी उपस्थित होते. पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसदस्यांनी मुरूड तालुक्यातील अगरदांडा, बोर्ली, मांडला, नांदगाव येथेही स्वच्छता मोहीम राबविली.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply