परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
युवकांचे प्रेरणास्थान आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 18) पनवेलमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबण्यात आले. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या नगरसेवक निधीमधून डस्टबीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कामोठे सेक्टर 10 आणि 19 मध्ये डस्टबीनचे वाटप करण्यात आले.
या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक विकास घरत, भाजपचे कामोठे शहर चिटणीस शरद जगताप, अनिल चव्हाण, महेंद्र गविारी, मयुर चिपळेकर, प्रितम तांबडे, संग्राम किचेवाड, मल्हारी साकत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होेेते.