Breaking News

माथेरानच्या शार्लोट लेकच्या संवर्धनाला सुरुवात

तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

कर्जत : बातमीदार

ब्रिटिश कालीन शार्लोट लेकचे पाणी माथेरानसाठी जीवनवाहिनी समजले जाते. नगर परिषदेने या तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे शार्लोट लेकची पाणी साठवण क्षमता क्षमता वाढणार आहे. या कामासाठी नगर परिषदने सव्वा सात लाखाचा निधी मंजूर केला आहे.

माथेरान नगर परिषदेच्या माध्यमातून शार्लोट लेकची दरवर्षी साफसफाई केली जाते. मात्र जंगल भागात असल्याने पावसाच्या पाण्यासोबत झाडांचा पालापाचोळा तसेच माती शार्लोट लेकमध्ये वाहून येतेे. त्यामुळे या तलावात दरवर्षी गाळ जमा होतो. 2012 मध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम श्री सदस्यांनी केले होते. त्यानंतर नगर परिषद दरवर्षी मनुष्यबळ वापरून शार्लोट लेकची स्वच्छता करत आहे. येणारा पावसाळा लक्षात घेऊन माथेरान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा ठेका मंजूर केला आहे.

सव्वा सात लाख रुपये खर्च करून शार्लोट लेक मधील गाळ काढण्याचे काम केले जात आहे. हा गाळ पावसाळ्यात पुन्हा तलावात जाणार नाही, यासाठी तो अन्य ठिकाणी नेला जाणार आहे. शार्लोट लेकमधील गाळ काढण्यात येत असल्याने तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे. सध्या तलावात 27 फूट इतके पाणी आहे. नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे पथक शार्लोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामावर लक्ष ठेवून असल्याची माहिती  मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी दिली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply