Breaking News

दहिवलीतील शवदाहिनीचे पत्रे जीर्ण

पावसाळ्यापूर्वी बदलण्याची गरज

कर्जत : प्रतिनिधी

नगर परिषद हद्दीतील दहिवली परिसरात असलेल्या गॅस शवदाहिनीवरील पत्रे जीर्ण झाले आहेत, ते पत्रे पावसाळ्यापूर्वी बदलले नाही तर मशीनवर पाणी पडून शवदाहिनी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेने शवदाहिनीवरील जीर्ण झालेले पत्रे त्वरित बदलावेत, अशी मागणी होत आहे.

कर्जत नगर परिषद क्षेत्रात मुद्रे, गुंडगे, भिसेगाव, कर्जत, दहिवली या ठिकाणी स्मशानभूमी आहेत. मात्र त्या ठिकाणी लाकडांचा वापर करून अंत्यविधी केले जातात. कर्जत नगर परिषद व मुंबई मेट्रोपोलिटन रिजनच्या इन्व्हायरमेंट इम्प्रुमेंट सोसायटी मार्फत दहिवली येथील स्मशानभूमीमध्ये 20 जानेवारी 2011 रोजी गॅसवर आधारित शवदाहिनीचे भूमिपूजन करण्यात आले होते. 3 मार्च 2013 रोजी ही गॅसवर आधारित शवदाहिनीचे लोकार्पण करण्यात आले.

नगर परिषद क्षेत्रातील स्मशानभूमीत लाकडांची कमतरता भासत असल्याने दहिवली येथील गॅसवर आधारित शवदाहिनीमध्ये अंत्यविधी करण्याचा कल वाढला आहे, मात्र या स्मशानभूमीतील शववाहिनीची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. शवदाहिनी मशीन असलेल्या शेडचे पत्रे नऊ वर्षांमध्ये जीर्ण झाले आहेत ते या पावसाळ्यापूर्वी बदलणे गरजेचे आहे. अन्यथा जीर्ण झालेल्या पत्रातून पाणी पडून शवदाहिनी मशीन बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  त्यामुळे या पावसाळ्यापूर्वीच शवदाहिनीच्या शेडवरील जीर्ण झालेले पत्रे बदलणे गरजेचे आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply