Breaking News

सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करा; रायगड जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी

‘शिवतीर्थ‘ या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत जवळपास आठ हजार इमारती आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसह पंचायत समित्या, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायती, पशुवैद्यकीय दवाखाने व इतर इमारतींचा समावेश आहे. या इमारतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सोयी सुविधा पुरविण्यात येतात. मात्र काही इमारतींमध्ये अखंडित वीज पुरवठा होत नाही. विशेषतः अंगणवाड्यांमध्ये अखंडित वीज पुरवठा होत नसल्याने गरोदर महिला, स्तनदा माता, बालके, ज्येष्ठ व गरजू रुग्ण यांना सेवा सुविधा देण्यात ग्रामीण यंत्रणेमध्ये अनेक अडचणी येतात. यामुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व इमारतींचे  ऊर्जा विकास अभिकरण मार्फत सर्वेक्षण करून जास्तीत जास्त इमारतींमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा स्थापीत करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी रायगड जि. प.तर्फे करण्यात आली आहे.

जि.प.च्या अखत्यारीतील इमारती

जि.प. मुख्यालय (शिवतीर्थ) – 1

पंचायत समिती – 15

एकात्मिक बाल वि. प्रकल्प – 17

अंगणवाड्या – 3234

प्राथमिक शाळा – 3206

प्राथमिक आरोग्य केंद्र – 53

उपकेंद्र – 288

ग्रामपंचायत – 810 पशुवैद्यकीय दवाखाने – 100

Check Also

नवीन पनवेलमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे काम वेगाने सुरू

माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केली पाहणी पनवेल ः रामप्रहर …

Leave a Reply