Breaking News

शिर्कीचाळ येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; लाखोंचे नुकसान

पेण : पेण

तालुक्यातील शिर्कीचाळ नंबर 2 येथील सागरवाडी येथील यशवंत पाटील यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून सुमारे दोन लाख तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सागरवाडी येथे यशवंत पाटील, सुमन पाटील व भूषण पाटील यांचे सामूहिक मालकीचे घर असून कुटुंबातील सर्व व्यक्ती कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनाला गेले होते. शॉर्टसर्किटमुळे सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घराला आग लागली आणि संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

या आगीत घरातील सर्व फर्निचर, संपूर्ण विद्युत फिटिंग, टीव्ही, फ्रिज, पंखा आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू,  सर्व कागदपत्रे व भात, तांदुळ सर्व कडधान्य आदी जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या.

सदर आगीची बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरताच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, वडखळ पोलीस आदींनी तात्काळ घटनासथळाला भेट दिली.

पोलीस व महसूल विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने सीएसआर फंडातून सदर कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी सागरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

Check Also

अष्टपैलू गायिका आशा भोसले

आशा भोसले… सुरुवात कुठून करावी असा या व्यक्तिमत्वाची खोलवर ओळख करून देताना मला प्रश्न पडतोय …

Leave a Reply