Breaking News

नवी मुंबईत भाजपचा जनतेशी संवाद

आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार पदाधिकारी व नागरिकांमधील बैठकांना सुरुवात

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार

आगामी नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार सामान्य जनता आणि भाजप प्रमुख पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठका सुरू झाल्या आहेत. नेरुळमधील प्रभाग क्र. 34 मध्ये भाजप कार्यकर्ते आणि जनतेची समनव्य बैठक अ‍ॅड. गणेश रसाळ यांच्या पुढाकाराने येथील अभिनंदन हॉलमध्ये झाली. या बैठकीत भाजप युवा नेते सुरज पाटील यांनी नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले, तसेच आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहरात केलेल्या विकास रचनात्मक विकास कामे नागरिकासमोर मांडली.

या वेळी आयोजित संवाद बैठकीत भाजपचे युवा नेते सुरज पाटील यांनी मार्गदर्शनपर बोलताना सांगितले की, माजी मंत्री गणेश नाईक यांना मानणारा मोठा वर्ग नवी मुंबईत असून कोरोनाच्या काळात गरजू  नागरिकांना वैद्यकीय मदत, अन्नधान्य वाटप पासून सर्व प्रकारची मदत जनतेला देण्याचे काम अहोरात्र केले आहे. आपणास जनतेला अभिप्रेत असणारी विकास कामे करायची असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

या संवाद बैठकीत नेरूळमधील विविध हौसिंग सोसायट्यातील प्रमुख, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. विशेषतः सानपाडा स्टेशन ते सिवूडसदरम्यान नवी मुंबई मनपाने परिवहन रिंग रूट सेवा सुरू करावी, नागरिकांनी गरजेपोटी वाढवलेली बांधकामे कायम करणे, नेरूळ सेक्टर 8मध्ये पोलीस चौकी निर्माण व्हावी, उद्यान दिवसभर सुरू असावी, घरगुती उद्योग उपलब्ध करून  प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू व्हावे, रस्त्यावर कोठेही टाकण्यात येणारे डेब्रिज उचलण्यात यावे, वृक्ष छाटणी व्हावी, नेरूळमधील विविध ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकण्यात येतो पावसाळ्यात त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येऊन रोगराई पसरू शकते. त्यामुळे कचरा कुंड्या व डबे पालिकेने विविध सासोयट्यांना पुरवाव्यात आदी समस्या बैठकीत उपस्थित हरिश्चंद्र पाटील, भाऊ ठाकूर  ज्योती अढागळे, के. जी. पै, नारायण धोंडे, रामू शिरवाळे, रतन पाटील, निखिल भोयर आदींनी मांडल्या.

या वेळी लिखित स्वरूपात प्राप्त झालेल्या तक्रारी नवी मुंबई मनपाच्या माध्यमातून सोडवल्या जातील, असे आश्वासन आयोजक अ‍ॅड. गणेश रसाळ यांनी उपस्थित जनतेस दिले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply