Breaking News

राष्ट्रीय युनिफाईट स्पर्धेत रितुल म्हात्रे, यश जोशी यांना सुवर्ण

पेण ः प्रतिनिधी

पालमपुर, हिमाचल प्रदेश येथे नुकत्याच युनिफाईट आसोशिएशन इंडिया यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय यूनिफाईट स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोशिएशनच्या शिहान रविंद्र म्हात्रे व सेन्साय प्रथमेश मोकल यांच्याकडे युनिफाईटचे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी रितुल रवींद्र म्हात्रे आणि यश उदय जोशी यांनी सुवर्ण पदक पटकावले. त्यांची रशिया येथे होणार्‍या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोघांची निवड झाली. या निवडीमुळे त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे नाव उंचावल्यामुळे या दोघांचे युनायटेडचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र युनिफाईटचे सचिव मंदार पनवेलकर तसेच युनिफाईटचे महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष खंदारे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे पदाधिकारी व प्रशिक्षक विनित साठे, सागर कोळी, चिंतामणी मोकल, पियुष सदार्वते, प्रशांत गागुर्डे, निलेश भोसले, प्रतिक करांडे, निलेश ओव्हाळ, अदित्य तेरेदेसाई, प्राजक्ता तेटमे, रविना म्हात्रे, जान्हवी वनगे, शार्दुल बामगुडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply