Breaking News

शाळेला जातो आम्ही…

जिल्ह्यात दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

अलिबाग : प्रतिनिधी

सर्वशिक्षा अभियानातंर्गत सरकारतर्फे रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. ही पुस्तक शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 16 जून रोजी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येते. या वर्षी  जिल्ह्यात पहिली ते पाचवीपर्यंत 1 लाख 19 हजार 285 विद्यार्थ्यांसाठी 5 लाख 55 हजार 370, सहावी ते आठवीपर्यंतच्या 1 लाख 11 हजार 456 विद्यार्थ्यांसाठी 5 लाख 79 हजार 749 अशी एकूण 2 लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना 11 लाख 35 हजार 119 पुस्तके मिळावीत, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालभारतीकडे केली आहे.

शिक्षण विभागाकडे पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर, ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकार्‍यांकडे पाठविण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.

आरटीई अंतर्गत प्रवेश

आरटीई अंतर्गत आत्तापर्यंत 1403 प्रवेश झाले आहेत. यात पनवेल येथे 983, माणगाव येथे 83, खालापूर येथे 63, महाड येथे 41, कर्जत येथे 30, पेण आणि रोहा येथे प्रत्येकी 28, अलिबाग येथे 17, मुरूड येथे आठ आणि पोलादपूर येथे सहा प्रवेश झाले आहेत. तर श्रीवर्धन, म्हसळा, सुधागड या तालुक्यामध्ये एकही प्रवेश झाला नाही. पेण आणि पनवेल येथील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात आले आहेत. पनवेल, अलिबाग, पेण, खालापूर येथील 600 पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झालेले नाहीत, त्यामुळे पालकांनी प्रवेश प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

एक हजार 403 विद्यार्थ्यांना आरटीईचा लाभ

समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू करण्यात आला आहे. चांगल्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी 2 हजार 171 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना 254 शाळामंध्ये प्रवेश दिला जाणार होता. मात्र यापैकी 1 हजार 403 विद्यार्थ्यांनीच 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतला. अद्यापही 763 विद्यार्थांनी प्रवेश घेतलेला नाही. आरटीई अंतर्गत प्रवेशाची मुदत 10 मे रोजी संपते आहे. त्यामुळे ज्या पालकांनी अद्याप आपल्या पाल्यांची प्रवेश प्रक्रीया पूर्ण केली नाही. त्यांनी तातडीने ती पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी केले आहे.

आरटीईअंतर्गत रायगड जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी एक हजार 403 बालकांना आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेशाची मुदत 10 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी आपल्या पाल्यांसाठी शैक्षणिक प्रवेश घेतला नाही, त्यांनी तातडीने प्रवेश घ्यावा.

-शैलजा दराडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply