Breaking News

कळंबोली पुलावर टायर फुटून ट्रक उलटला

पनवेल : वार्ताहर

पनवेल महामार्गावरील कळंबोली पुलावर टायर फुटून एक ट्रक पलटी झाला आहे. या दुर्घटनेत ट्रकच्या आतील असलेल्या काचेच्या खिडक्यांचा माल पुलावर पसरल्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा पुर्णत: चुराडा झाला.

अल्युमिनियमच्या दरवाजाचा माल घेऊन हा ट्रक सायन-पनवेल महामार्गावरून जात होता. कळंबोली पुलावर आल्यानंतर अचानक या ट्रकचा टायर फुटला आणि चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. या वेळी ट्रक पलटून पुलावर आदळला. यात ट्रकच्या काचा फुटून संपूर्ण रस्त्यावर पसरल्या. टायर फुटल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिकांनी महामार्गावर धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिक व वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहचले व त्यांनी क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या ट्रकचा बाजूला केला. यात कुणीही जखमी झाला नसल्याची माहिती मिळत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply