Breaking News

कसळखंडच्या उपसरपंचपदी भाजपच्या मोनिका पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त

कसळखंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या मोनिका महादेव पाटील विजयी झाल्या आहेत.

कसळखंड गु्रपग्रामपंचयतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक मंगळवारी (दि. 12) झाली. यामध्ये 5 विरुद्ध 4 मतांनी त्या निजयी झाल्या असून, त्या उपसरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी नवनिर्वाचीत उपसरपंच मोनिका पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

या वेळी सरपंच माधुरी पाटील, सदस्य राजश्री रवींद्र घरत, निवेदिता नितीन लबडे, लता अनंता पाटील, माजी उपसरपंच महेंद्र अनंता गोजे, गुळसूंदे जि. प. विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, नगरसेवक बबन मुकादम, प्रवीण ठाकूर, अनिल पाटील, तानाजी पाटील, अशोक भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मोनिका पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply