पनवेल : रामप्रहर वृत्त
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’, संतश्रेष्ठ तुकोबांच्या या उपदेशानुसार आज दिनांक 10 जुलै 2022 आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी हितवर्धक संघ (SZRHS) पनवेल यांच्यातर्फे पनवेल स्टेशन जवळील दुभाजकावर वृक्षारोपणाचा उपक्रम झाला. या उपक्रमाला पनवेलचे नगरसेवक आणि भाजपाचे शहर अध्यक्ष श्री जयंत पगडे साहेब आणि तरुण नगरसेवक तेजस कांडपिळे साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संघटनेचे उपाध्यक्ष श्री संतोष चव्हाण सर यांनीउपस्थितांचे स्वागत केले. संघटनेचे अध्यक्ष श्री केशवराव राणे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. बाप्पा मोचेमाडकर साहेब आणि संस्थेचे लहान थोर सभासद अतिशय उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे सिंधुदुर्ग रहिवाशी संघटनेतर्फे एकूण 65 गुलमोहरांच्या वृक्षांची रोपांची लागवड केली गेली. एवढेच नाही तर काही दिवसांनी रोपे व्यवस्थित वाढली की त्यां वृक्षांना दत्तक घेतलेल्या सभासदांच्या नावाचे लेबल केले जाईल. ही झाडे व्यवस्थित वाढण्यासाठी त्यांचे योग्य जतन करण्याची जबाबदारी सुद्धा संस्थेने उचलली आहे. म्हणजेच सभासदांच्या स्वकीयांच्या स्मरणार्थ लावलेली ही झाडे बहरताना पाहण्याचा एक अवर्णनीय आनंद सर्वांना लाभणार आहे. असा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत असल्या बदल नगरसेवक जयंत पगडे यांनी सिंधुदुर्ग रहिवाशी हितवर्धक संघाचे कौतुक केले आणि पर्यावरण संतुलन व संवर्धन अशा कार्यात संघाने वेळौवेळी दिलेल्या योगदानाबद्दल आभार ही व्यक्त केले. गेल्यावर्षी संघाने आदीई तलावाची स्वच्छता केली. या कार्याची दखल घेऊन डनठकड ला पनवेल महानगरपालिके तर्फे स्वच्छता दूत पुरस्कार मिळाला होता या पुरस्कारासाठी ही पगडे साहेबांनी SZRHS चे अभिनंदन केले.
पर्यावरण संवर्धनाच्या संघाच्या अश्या सर्व उपक्रमात महानगरपालिकेचे सदैव सहकार्य सिंधुदुर्ग रहिवाशी संघा सोबत राहील अशी ग्वाही ही त्यांनी या प्रसंगी दिली. यानंतर श्री जयंत पगडे साहेब आणि तेजस साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन झाले. आणि सर्व उपस्थितांनी वृक्षारोपणाचा आनंद घेतला आणि वृक्षांचे जतन करण्याची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper