Breaking News

पूरग्रस्तांना आधी मदत मग पुनर्वसन!

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; वर्ध्यात पाहणी

वर्धा : प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कान्होली गावास भेट दिली. पूरग्रस्तांना आधी अधिकाधिक आर्थिक मदत दिली जाईल आणि त्यानंतर त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम हिंगणघाट येथे पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी कान्होली गावास भेट दिली. येथील पुरग्रस्तांची ग्रामपंचायत इमारतीत तात्पुरती सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी गावकर्‍यांनी मदतीची मागणी केली. वारंवार पूर येतो, दरवर्षी आम्हाला स्थलांतर करावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपी पुनर्वसन करून द्या, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली. ती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली.
या वेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, आमदार रामदास आंबटकर, आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते. त्यांच्याशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कान्होली ग्रामस्थांच्या पुनर्वसनासंदर्भात चर्चा केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply