उरण ः वार्ताहर
जेएनपीए येथील सेंट मेरी स्कूलमधील विद्यार्थीनी दिव्या महेंद्र ठाकूर हिने नवीन पनवेल येथे आयोजित मॅरेथॉनमधे दुसरा क्रमांक तसेच पुणे मॅरेथॉनमधे चौथा क्रमांक मिळविला. याबद्दल सेंट मेरी स्कूलचे प्रिन्सिपल राजेश अल्फान्सो, क्रीडा शिक्षक हरिश्चंद्र धोंडकर, लुक्की स्पोर्ट्स अकादमीचे लक्ष्मण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन दिव्या ठाकूर हिचे कौतुक केले. त्याचप्रमाणे धुतूम ग्रामस्थांनी दिव्या व तिचे वडील महेंद्र ठाकूर यांचे अभिनंदन केले.