Breaking News

मुंबई-गोवासह पाच वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

भोपाळ : वृत्तसंस्था
देशवासीयांना एकाच दिवशी पाच वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 27) मडगाव (गोवा)-मुंबई, भोपाळ-इंदौर, भोपाळ-जबलपूर, रांची-पाटणा आणि धारवाड-बंगळुरू अशा पाच वंदे भारत रेल्वेगाड्यांना भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखविला.
एकाच दिवसात पाच सेमी हायस्पीड ट्रेन सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मध्य प्रदेशला या वेळी दोन वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली. याशिवाय गोवा, बिहार आणि झारखंडला पहिली, तर कर्नाटकला दुसर्‍या वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. महाराष्ट्रातील ही पाचवी वंदे भारत ट्रेन आहे. ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
या सोहळ्याला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यासह देशातील वंदे भारत गाड्यांची संख्या आता एकूण 23 झाली आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत साकारण्यात आलेली ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply