Breaking News

खारघरमधील गणेश मंदिराचा कळसरोहण सोहळा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर, हाईड पार्क सोसायटी मधील गणेश मंदिराच्या कळस रोहणाचा भव्य कार्यक्रम सोहळा पार्कच्या रहिवाश्यांनी विधीवत जल्लोषात साजरा केला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली.

सकाळी पंचांग पूजन, होम हवन आणि कळस पूजन करण्यात आले आणि त्यानंतर कळस यात्रा काढण्यात आली. अग्रक्रमी ढोल-ताशा नंतर कळस पालखी, पारंपारिक वेशभूषेतील रहिवाशी, भजन मंडळी, देवदेवतांच्या वेषातील बच्चे कंपनीचा चित्ररथ, महिलांच्या फुगडी, असा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक दणकेबाज कार्यक्रम होता.

कळस रोहणानंतर सोसायटीने नागरिकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जवळपास 1500 नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.

या सोहळ्यास भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत,  माजी नगरसेवक पापा पटेल, मंडल चिटणीस सचिन वासकर, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी यांच्यासह खारघरमधील विविध मठ-मंदीर प्रमुख तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद, विश्वमांगल्य सभा, भारत रक्षा मंच अशा विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते. सोसायटीने सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply