Breaking News

श्रीकृष्ण जन्माष्टमी यंदा साधेपणाने

उरण : वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग नियम व सर्व मंदिरे बंद असल्याने यंदा नागरिकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता आपल्या घरीच साधेपणानेच साजरी केली. आपल्या घरतील चौरंगाच्या बाजूस रांगोळी काढून चौरंगावर मधोमध पाळणा ठेऊन त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेऊन त्याची यथासांग पूजा केली. श्रीगणेश व बाळकृष्ण यांना अभिषेक घालून फळ, फुल वाहून रात्री ठिक 12 वाजता श्री कृष्ण देवाचा पाळणा गाऊन यथासांग आरती करण्यात आली. तसेच  सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटण्यात आला. देवाला पोहे व दही याचे नैवेद्य दाखविण्यात आला.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply