Breaking News

जादुगार पी. बी. हांडेंची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले कौतुक

पनवेल : रामप्रहर वृत्त

सुप्रसिद्ध जेष्ठ जादुगार, सामाजिक कार्यकर्ते, लोकसारथीचे संपादक जादुगार पी. बी. हांडे याची नुकतीच मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही नोंद त्यांनी खोपोली ते पनवेल 36 कि. मी. डोळ्यावर पट्टी बांधून मोटरसायकल चालविण्यासाठीच्या राष्ट्रीय एकात्मकतेसाठी केलेल्या धाडसी उपक्रमासाठी झाली आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी जादुगार हांडे हे खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचे भुषण व प्रबोधनकार असल्याचे गौरोद्गगार काढले.

राष्ट्रीय एकात्मकतेसाठी केलेल्या या उपक्रमात वेगवेगळ्या राज्यातील वेशभुषा परिधान केलेले मोटरसायकल स्वार होते. त्यांच्या हातात अंधश्रद्धा, भ्रष्टाचार विरोधी, हुंडाबळी, व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, आरोग्य या आशयाचे  सामाजिक प्रबोधनाचे फलक होते. जादुगार हांडे यांनी जादुची दुनिया या स्टेज जादु प्रयोगाचे 5000च्या वर कार्यक्रम सादर करून शेकडो सामाजिक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे.

रहस्य चमत्काराचे या अंधश्रद्धा निर्मुलन सहप्रयोग व्याख्यानाचे महाराष्ट्रात विद्यालये, महाविद्यालये, महिला मंडळे, सामाजिक संस्थांमध्ये 650 कार्यक्रम सादर करून अंधश्रद्धा निर्मुलनाचे प्रभावी काम गेली 32 वर्षे करत आहेत. कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानबद्दल त्यांना भारत सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या पुरस्कारासोबत विविध राज्य स्तरीय व राष्ट्रीय संस्थानी 127 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ही रेकॉर्ड नोंद झाल्याबद्दल त्यांच्यावर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply