Breaking News

सामाजिक एकतेचे प्रतिक रोह्यातील भुवनेश्वरचा राजा

रोहे : प्रतिनिधी
गेली कित्येक वर्षे विविथ जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही रोहा तालुक्यातील भुवनेश्वर राजाच्या गणेशोत्सवातून जोपासली आहे. कामगार चळवळीतून उभे भुवनेश्वर येथील गणेशेात्सव मंडळ उभे राहिले आहे. निरलॉन कॉलनीमध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते. या वर्षी रामायणातील कुंभकर्णाचे चलचित्र मंडळाने साकरले आहे.रक्तदान शिबिरासह अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम या मंडळाच्या वतीने राबविण्यात येतात.
रोहा तालुक्यात कुंडलिका तिरावर व कळसगिरीच्या पायथ्याशी भुवनेश्वर हे गाव वसलेले आहे. या गावात विविध समाजाचे, जातीचे कामगार एकत्रित येऊन उत्सव सण गुण्यागोविंदाने साजरे करतात. भुवनेश्वरमध्ये सर्वात जुनी वस्ती असलेली निरलॉन कॉलनी आहे. या कॉलनीत कामगार वर्गाने 1979 साली गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. गेली 53 वर्षे अविरतपणे हा उत्सव तेवढ्याच दिमाखात आजही सुरू आहे.
आर्थिक मंदी व अन्य कारणास्ताव कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्यामुळे व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याचे ठरविले. त्यामुळे हा उत्सव सुरू ठेवणे जिकिरीचे होते, मात्र गणरायाचा आशीर्वाद व येथील एकत्र येऊन जय गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून हा उत्सव पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प केला व त्यांच्या संकल्पनाला यश आले. आजही जय गणेश मित्र मंडळाचा गणपती हा नवसाला पावणारा भुवनेश्वरचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. 2001 साली जय गणेश मित्र मंडळ भुवनेश्वर या नावाने मंडळ स्थापन करत आले. दिवस-रात्र मेहनत घेऊन चलचित्र देखावे, मंडप उभारणी, वर्गणी गोळा करणे यासारखी अनेक कामे सर्व सदस्य करीत असतात. गणेश चतुर्थीच्या तीन ते चार महिने आधी या कामाची सुरुवात होते. वेळोवेळी येणार्‍या संकटातून गणरायाच्या आशीर्वादाने मार्ग काढीत मंडळाची वाटचाल सुरू आहे. सकाळ-संध्याकाळ आरती, पुजा, प्रसाद हा दिनक्रम सुरू असतो. मंडळाचे कार्यकर्ते व्यवस्थीत रित्या या उत्सवाचे नियोजन करीत असतात.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply