Breaking News

पेण तालुक्यात पावसाचा धुमाकूळ ; वीज कोसळून घराचे नुकसान

पेण : प्रतिनिधी      
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी (दि. 7) सायंकाळी विजेच्या गडगडाटासह हजेरी लावून पेणकरांना भांबावून सोडले. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व गटारे तुडुंब भरून वाहू लागली. अनेक दुकानांमध्ये व घरांमध्ये गटारांचे पाणी शिरले. एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. नदीकिनारी असल्या घरांमध्येसुद्धा पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले. भाल या गावात देविदास म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून घरातील वस्तूंचे नुकसान झाले.
गावातील नैसर्गिक पाण्याचा निचर्‍याचा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरून ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. गडब गावात ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या परिस्थितीची पाहणी करण्याकरिता तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, मुख्याधिकारी जीवन पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, आदींसह तलाठी वर्ग यांनी ठिकठिकाणी पाहणी केली. मुसळधार पावसाने हजेरी लावली सलग दोन तास पडणार्‍या पावसामुळे तालुक्यातील बत्तीगुल झाली होती. अथक प्रयत्नाने रात्री 9 वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरण कर्मचार्‍यांना यश आले.
महामार्गावर तसेच पेण शहरात वाहतूक कोंडी झाली होती.  भाल या गावात देविदास म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून घरातील वस्तूंचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. तालुक्यात सात  घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. सायंकाळी परतणार्‍या कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांचीही धावाधाव झाली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply