Breaking News

“रवींद्र वायकर यांनी 500 कोटींचा घोटाळा केला”

किरीट सोमय्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांचा तिसरा हात असलेल्या रविंद्र वायकर यांनी जोगेश्वरीच्या 2000 वर्षांपूर्वीच्या महाकाली गुफा आणि रस्त्यांच्या कामात 500 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्यांनी केला. ते गुरुवारी (दि. 8) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरेंचा तिसरा हात रविंद्र वायकर आहे. त्यांनी एक कारनामा केला आहे. मुंबई पालिकेने मुंबईतील जोगेश्वरीच्या 2000 वर्षांपूर्वीच्या महाकाली गुफा आणि तेथे जाणार्‍या रस्त्यासाठी 500 कोटी रुपयांचे बांधकामाचे अधिकार एका बिल्डरला दिले. हा बिल्डर अविनाश भोसले हा आहे. तेही बहुतेक तुरुंगातच आहेत.
उद्धव ठाकरेंचा उजवा हात असलेले संजय राऊत तुरुंगात गेले. डावा हात अनिल परबांचे रिसॉर्ट तोडले जाणार आहे. फौजदारी प्रक्रिया सुरू झाली आहे. एक नाही तर तीन तीन गुन्हे दाखल झालेत. आता तिसरा हात रविंद्र वायकर आहे. त्यांचा घोटाळा बाहेर येत आहे. त्या सरकारची कृपा असणारा चौथा हात अविनाश भोसलेही तुरुंगात आहे, असे म्हणत सोमय्यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका केली.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply