Breaking News

कर्जत शहरातील विकासकामांचे आमदार थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण

कर्जत : प्रतिनिधी

नगर परिषद हद्दीतील दहिवली परिसरात करण्यात आलेल्या सुमारे 36 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक संकेत भासे यांच्या माध्यमातून या सर्व विकासकामांच्या निधीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली विभागात छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, साईनगर गार्डन, संजय नगर येथील रस्ता, बस थांबा आणि अंतर्गत रस्ते अशी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नगरविकास विभागाच्या वैशिट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला होता. या सर्व विकासकामांचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगर परिषदेचे बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर, नगरसेविका सुवर्णा निलधे, विशाखा जिनघरे, मधुरा चंदन, नगरसेवक बळवंत घुमरे, मुख्याधिकारी वैभव गारवे, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, ज्येष्ठ नेते संतोष भोईर, विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख पंकज पाटील, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, युवासेनेचे शहर अधिकारी सचिन भोईर, शहर संपर्क प्रमुख अभिजित मुधोळकर, ऋषभ  लाड, उपशहर प्रमुख दिनेश कडू, विभाग प्रमुख विशाल बैलमारे, स्थानिक नागरिक रमाकांत जाधव, दिलीप बोराडे, अजय सुवर्णे, डॉ. वैद्य , डॉ. म्हात्रे, सुरेश खानविलकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply