
नागोठणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेमुळे काही अंशी उशिरा चालू झालेल्या नागोठणेतील पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला सोमवार (दि. 13) पासून प्रारंभ झाला असल्याची माहिती सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी दिली. नागोठणे शहरात ज्या ज्या ठिकाणी नाले आहेत, अशा सर्व नाल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधित काम वेगाने होण्यासाठी जेसीबी यंत्रणेचा वापर करण्यात येत असल्याचे डॉ. धात्रक यांनी यावेळी सांगितले. शहरातील सर्व नाल्यांची 31 मेपर्यंत साफसफाई पूर्ण करण्याचे ध्येय्य असल्याचे डॉ. धात्रक यांनी या वेळी स्पष्ट केले.