Breaking News

अतिवृष्टीमुळे रसायनी पोलीस ठाण्यात पाणी

मोहोपाडा ः रामप्रहर वृत्त

गेले दहा दिवस पावसाने चांगलाच कहर केला आहे. दोन दिवस सुरू असणार्‍या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. रविवारी (दि. 4) दुपारपर्यंत ठिकठिकाणी पाणी साचल्याने सतर्कंतेचा इशारा देण्यात आला होता.नदीच्या थोडयाच अंतरावर असणार्‍या रसायनी पोलिस ठाण्याच्या आवारात   तीन फूट पाणी साचल्याने पोलीस ठाण्यातील विविध साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

 पाण्याची पातळी वाढल्याने आठ टेबल, तीन बेड, वीस खुर्च्या, पोलीस ठाण्यातील लॅपटॉप, पीसी, दस्तऐवज आदी साहित्य खराब झाल्याचे रसायनी पोलिसांनी सांगितले. यावेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या चोहोंकडून पाणी साचल्याने पोलीस ठाण्याकडे येण्या-जाण्याचा मार्ग काहीकाळ बंद झाला होता. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाण्याची पातळी दुपारच्या सुमारास कमी झाल्याने कामकाज सुरळीत सुरू झाले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply