Breaking News

एनसीएने थकवलेय पोलीस सुरक्षेचे बिल

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयपीएलच्या इतर मॅचच्या सुरक्षेचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. माहितीच्या अधिकारात ही गोष्ट समोर आली आहे. अनिल गलगलींनी टाकलेल्या आरटीआयला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे. एमसीएने 21.34 कोटी रुपये दिलेले नाहीत, यामध्ये 5.61 कोटी रुपयांचं व्याज आहे. हे पैसे 2018 पर्यंतच्या आयपीएल आणि इतर मॅचना देण्यात आलेल्या सुरक्षेचे आहेत. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये मुंबई पोलिसांनी गृहमंत्रालयाचा 31 मार्च 2019चा आदेश मानून, टीम, ठिकाणं, खेळाडू आणि बाकी जागांना सुरक्षा दिली होती.

या आरटीआयबद्दल गलगली म्हणाले, ‘सहायक पोलीस आयुक्त दिलीप थोरात यांनी आरटीआयला उत्तर देताना सांगितलं, वनडे आंतरराष्ट्रीय, टी-20 वर्ल्ड कप, टेस्ट आणि महिला वर्ल्ड कपसाठी दिलेल्या सुरक्षेसाठीची रक्कम अजूनही बाकी आहे. दिवसेंदिवस ही रक्कम वाढत चालली आहे.’

पोलिसांनी आयपीएल 2019चं बिल अजूनही बनवलेलं नाही, कारण राज्य सरकारकडून अजून कोणताही आदेश आलेला नाही. मागच्या वर्षी मुंबईत झालेल्या 9 मॅचसाठी मुंबई पोलिसांना 1.48 कोटी रुपये देणं होतं, पण एमसीएने अजूनही हे बिल भरलेलं नाही. ‘पोलीस ज्या पद्धतीने मॅचसाठी लगेच सुरक्षा देतात, त्या पद्धतीने एमसीएनेही लगेचच बिलाची रक्कम दिली पाहिजे. आयपीएलच्या बिलाची रक्कम लगेच मिळाली पाहिजे, याकडे पोलीस अधिकार्‍यांनी लक्ष घातलं पाहिजे,’ असं मत अनिल गलगलींनी मांडलं.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply