Breaking News

हॉलिबॉल स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता

खारेपाट : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील जय बहिरीदेव संघ बहिरीचापाडा आयोजित जिल्हास्तरीय हॉलिबॉल टाकाटाकी स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता ठरला, तर उपविजेता बहिरीदेव संघ बहिरीचापाडा, तृतीय संघ नांदाईचा पाडा संघ, चतुर्थ क्रमांक जय बहिरीदेव संघ ठरला. स्पर्धेत उत्कृष्ट शूटर-सुधाकर पाटील बहिरीचापाडा, विजय म्हात्रे दादर-पेण यांना गौरवण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघ सहभागी होता.

स्पर्धचे उद्घाटन माणकुळे ग्रामपंचायत सरपंच सुजित गावंड, उपसरपंच पल्लवी पाटील, सदस्य अभय म्हात्रे, विक्रम पाटील, अविनाश बांधणकर, लक्ष्मण पाटील व मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेे. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला सिंधू म्हात्रे, अविनाश बांधणकर, श्याम सुंदर पाटील, प्रमोद पाटील, गुरुनाथ म्हात्रे, दीनानाथ पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. पंच म्हणून सुनील म्हात्रे, सुधीर म्हात्रे, सुधाकर पाटील यांनी चांगल्या प्रकारे काम केले. सूत्रसंचालक प्रमोद म्हात्रे यांनी केले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply