Breaking News

‘नमो’पर्वाला दुसर्यांदा सुरुवात ; नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, अरविंद सावंत कॅबिनेट तर रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे राज्यमंत्री

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याचबरोबर भाजप आणि सहकारी पक्षांसह 58  खासदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामध्ये कॅबिनेट मंत्रिपदी भाजपचे नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल आणि शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे. राज्यमंत्रिपदी भाजपचे रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, तर आरपीआयचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून मोदींसह 25 जणांचा, तर राज्यमंत्री (स्वतंत्र भार) म्हणून नऊ जणांचा आणि राज्यमंत्री म्हणून 24 जणांचा शपथविधी झाला. 

गुरुवारी सायं. 6.57 वाजता नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दाखल झाले. त्यांनी ’मैं नरेंद्र दामोदरदास मोदी… ईश्वर की शपथ लेता हूं…’ हा 26 मे 2014 रोजी घुमलेला आवाज आज 5 वर्षे 4 दिवसांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातून देशभरात घुमला आणि ’नमोपर्व 2.0’ ची सुरुवात झाली.

’मोदी सरकार 2’ च्या शपथविधी सोहळ्यासाठी संध्याकाळी 5.30 वाजल्यापासूनच राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मान्यवर जमू लागले होते. 6.57 वाजता नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दाखल झाले. पुढच्या पाचच मिनिटांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आगमन झालं आणि राष्ट्रगीताची धून वाजली. त्यानंतर 7.04 च्या ठोक्याला नरेंद्र दामोदरदास मोदींचे नाव पुकारण्यात आलं आणि काही सेकंदातच ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं…’ हे ऐकताना सगळेच भारावले.

-सहा हजार पाहुण्यांचीं सोहळ्याला उपस्थिती

भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख, महासत्तांचे राजदूत, देशातील प्रमुख नेतेमंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांच्यासह सुमारे सहा हजार पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते.

– सार्कऐवजी बिमस्टेक संघटनेतील राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण

 या वेळी सार्कऐवजी बिमस्टेक संघटनेतील राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित करून मोदींनी पाकिस्तानला सीमेपार ठेवून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान या देशांचे प्रमुख या सोहळ्याचे साक्षीदार झाले. पाकिस्तानकडून मात्र कुणीही या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

– 1. नरेंद्र दामोदरदास मोदी, पंतप्रधान

2. राजनाथ सिंग

3. अमित अनिलचंद्र शहा

4. नितीन जयराम गडकरी (नागपूर, महाराष्ट्र)

5. डी. व्ही. सदानंद गौडा

6. निर्मला सीतारामन

7. रामविलास पासवान, (लोक जनशक्ती पार्टी)

8. नरेेंद्र सिंग तोमर

9. रविशंकर प्रसाद, (पाटणातून विजयी करून)

10. हरसिमरत कौर बादल

11. थावरचंद गेहलोत, मध्य प्रदेश

12. डॉ. सुब्रम्हण्यम जयशंकर

13. डॉ. रमेश पोखरियाल निशंख

14. अर्जुन मुंडा

15. स्मृती जुबिन इराणी, (अमेठीतून राहुलचा पराभव)

16. डॉ. हर्ष वर्धन

17. प्रकाश केशव जावडेकर (महाराष्ट्र)

18. पीयूष वेदप्रकाश गोयल (महाराष्ट्र)

19. धर्मेंद्र प्रधान (राज्यसभा)

20. मुख्तार अब्बास नक्वी

21. प्रल्हाद व्यंकटेश जोशी (धारवाड, कर्नाटक भाजप)

22. महेंद्रनाथ पांडे

23. अरविंद गणपत सावंत (महाराष्ट्र, मिलिंद देवरांचा 

                          पराभव करून विजयी)

24. गिरिराज सिंह (बिहार)

25. गजेंद्रसिंह शेखावत (राजस्थान, जयपूर)

* राज्यमंत्री स्वतंत्र पदभार

1. संतोष कुमार गंगवाल

2. राव इंद्रजित सिंह (गुडगाव, हरियाणा)

3. श्रीपाद यशो नाईक (गोवा)

4. डॉ. जितेंद्र सिंह (उधमपूर, काश्मीर)

5. किरण रिजीजू

6. प्रल्हाद सिंग पटेल (दामोह, मध्य प्रदेश)

7. राज कुमार सिंह (बिहार केडर, आयएएस, माजी गृहसचिव)

8. हरदीप सिंग पुरी

9. मनसुख लक्ष्मणभाई मांडविया

* राज्यमंत्री

1. फ ग्गनसिंग कुलस्ते

2. अश्विनी कुमार चौबे

3. अर्जुन राम मेघवाल

4.  व्ही. के. सिंह (माजी लष्करप्रमुख, सेवानिवृत्त)

5. कृष्णपाल गुर्जर (फ रिदाबाद, हरियाणा)

6. रावसाहेब दादाराव पाटील-दानवे (जालना, महाराष्ट्र)

7.  गंगापूरम किशन रेड्डी (सिकंदराबाद, तेलंगणा)

8. पुरुषोत्तम रूपाला (गुजरात राज्यसभा)

9. रामदास आठवले (महाराष्ट्र)  

10. साध्वी निरंजन ज्योती (हमीरपूर, उत्तर प्रदेश)

11. बाबूल सुप्रियो (पश्चिम बंगाल)

12. संजीव कुमार बालियन

13. संजय श्यामराव धोत्रे (अकोला, महाराष्ट्र)

14. अनुराग सिंग ठाकूर,

15. सुरेशचंद्र बसप्पा अंगडी

16. नित्यानंद राय

17. रतनलाल कटारिया

18. व्ही. मुरलीधरन

19. रेणुका सिंह

20. सोम प्रकाश (होशियारपूर पंजाब, माजी आयएएस)

21. रामेश्वर तेली

22. प्रतापचंद्र सरंगी, (ओडिसातील मोदी)

23. कैलाश चौधरी (बारणेर, राजस्थान)

24. देवाश्री चौधरी

शपथविधी सोहळा सुमारे सव्वा दोन तास चालला होता. राष्ट्रपती आल्यानंतर सोहळ्याला सुरुवात झाली होती. सुरुवातीला आणि शेवटी राष्ट्रगीत वाजवण्यात आले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply