Breaking News

त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद; अनेक शहरांमध्ये हिंसाचार, दगडफेक, तोडफोड

अमरावती ः प्रतिनिधी

त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी (दि. 12) महाराष्ट्रात मोर्चे काढण्यात आले होते. त्याला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागून परिस्थिती तणावपूर्ण बनली. बांगलादेशात नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गापूजेचे काही मंडप उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्याच रागातून त्रिपुरामध्ये हिंसाचार उसळला. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अमरावतीत मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला तसेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यादरम्यान एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावावर नियंत्रण मिळवले. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. नांदेडमध्येही बंद पुकारण्यात आला होता. काही जणांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तोडफोड आणि दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. मालेगावमध्येही बंदला गालबोट लागले. भिवंडी, हिंगोलीतदेखील या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला. बंदमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होती तसेच बाजारपेठा आणि दुकानेही बंद होती.

…तर हिंदूंचेही मोर्चे निघतील -आ. नितेश राणे

मालेगावमध्ये पोलीस परवानगी नसताना मोर्चा निघतो. दगड फेकले जातात. महाराष्ट्रात ताकद दाखवली जातेय. हिंदूंना घाबरवले जातेय आणि राज्य सरकार गप्प आहे. हे मोर्चे थांबवले नाहीत तर हिंदूंचेही मोर्चे निघतील हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील याची खबरदारी घ्यावी!

-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply