Breaking News

पिरवाडी समुद्र किनार्‍यावर वृक्षारोपण

उरण : बातमीदार

उरण पिरवाडी समुद्र किनार्‍याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत थिंक डिफरंट सोशल वेल फेअर असोसिएशन व सेव्ह अवर बीच संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात आले.

उरण तालुक्यातील झाडे, डोंगर, दर्‍या नष्ट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे उरण उजाड माळरान झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे. या ढासळत चाललेल्या पर्यावरणाचे जतन करण्यासाठी काही संस्था कसोशीने प्रयत्न करताना दिसतात. आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून थिंक डिफरंट सोशल वेल्फेअर असोसिएशन व सेव्ह अवर बीचच्या माध्यमातून नागाव पिरवाडी समुद्र किनार्‍यावर झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या वेळी आमदार मनोहर भोईर, सामाजिक नेते संतोष पवार, पं.स. सदस्य हिराजी घरत, उपसरपंच मोहन काठे, शाखाप्रमुख सचिन म्हात्रे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply