Breaking News

रायगडाची वाटचाल एचआयव्ही मुक्तीकडे

संसर्गाचे प्रमाण घटले

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्याची एचआयव्ही मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात 2014-15 मध्ये एचआयव्ही संसर्गित रुग्णाची संख्या 417 (0. 68 टक्के) इतके होते. त्यात घट होऊन नोव्हेंबर 2020 पर्यंत हीच संख्या 160 (0. 3 टक्के) पर्यंत खाली आली आहे. एचआयव्ही संसर्गित गरोदर मातांच्या संख्येतही घट होत आहे. मातेकडून बालकाला होणारा एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध करण्यामध्ये शासनाला 100 टक्के यश आलेले आहे.

रायगड जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग कार्यरत आहे. या विभागाकडून एचआयव्हीबाबत प्रबोधन, एचआयव्ही ग्रस्तांचे समुपदेशन केले जाते. व्यापक जनजागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे रायगड जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण घटले आहे. 

रायगड जिल्ह्यात 2014-15 मध्ये 61504 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात 417  जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. सन 20-21 मधील नोव्हेंबर 2020पर्यंत 59407 रुग्णाची तपासणी झाली असून अवघ्या 160 जणांना एचआयव्ही  संसर्गित झाल्याचे समोर आले. यावरून जिल्ह्यात एसआयव्ही संक्रमणाचे प्रमाण सातत्याने घटत आहे.

रायगड जिल्ह्यात सर्वसामान्य जनता यामध्ये ज्याप्रमाणे एचआयव्ही  संसर्गित  रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. एचआयव्ही  संसर्गित गरोदर मातांच्या संख्येतही घट होत आहे. यावर्षी नोव्हेंबर 2020 पर्यंत 25 हजार 729 गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी झाली असून त्यामध्ये अवघ्या 20 माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी 20 माता या एआरटी उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. सन 2020-21मध्ये एकूण 15 बालकांची डीबीएस (ड्राय ब्लड स्पॉट) तपासणी करण्यात आली असून ही सर्व 15 बालके एचआयव्ही संसर्गित नसल्याचे स्पष्ट होत आहे. इएमटीसीटी कार्यक्रमांतर्गत मातेकडून बालकाला होणारा एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध करण्यामध्ये शासनाला 100 टक्के यश आलेले आहे. गरोदर मातांकडून बालकांना होणारे एचआयव्ही संक्रमण रोखण्यात जिल्ह्याला शंभर टक्के यश आले, हि एक सकारात्मक बाब आहे. जिल्ह्यातील एचआयव्ही संक्रमणाचे प्रमाण अजून कमी व्हावे यासाठी प्रयत्न करावे लागतील.

-डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक रायगड

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply